भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, संयमी आणि जमिनीशी जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा प्रवास एका सामान्य कुटुंबातून सुरू होऊन राज्याच्या सत्तेतील महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचला आहे, जो अत्यंत प्रेरणादायी आहे.
चंद्रकांतदादांचा जन्म कोल्हापूरमधील एका सामान्य गिरणी कामगार कुटुंबात झाला. त्यांचे बालपण मुंबईतील चाळीत संघर्षात गेले. या संघर्षानेच त्यांना सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण करून दिली. त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मुंबईतील राजा शिवाजी (किंग जॉर्ज) शाळेतून पूर्ण केले. तर उच्च माध्यमिक शिक्षण हे प्रसिद्ध सिद्धार्थ महाविद्यालयातून पूर्ण केले.
राजकारणात येण्यापूर्वी दादांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून १३ वर्षे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आणि शैक्षणिक सुधारणांसाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे; तर संपूर्ण देशभर प्रवास केला. संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची नाळ याच काळात घट्ट झाली. २००४ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच आपल्या कामाच्या जोरावर भाजपमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले. २००९ आणि २०१४ मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करताना; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत वेळोवेळी आवाज उठवला.
सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पणन, महसूल, सार्वजनिक बांधकाम (PWD), आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन, कृषी, सहकार यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांचा विकास, शेतकरी कर्जमाफी, डिजीटल सातबारा आदी महत्वाच्या निर्णयांमध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये मोलाची भूमिका बजावली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाला संघटनात्मक मजबुती दिली.
जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य आदी विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. याच काळात ८ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (Medical, Engineering इ.) १००% शुल्क माफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच, २०२३-२०२८ चे राज्याचे वस्त्रोद्योग धोरण आखण्यातही त्यांची महत्वाची भूमिका राहिली. सध्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून दादांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारे निर्णय घेत आहेत.
सन २०१९ पासून विधानसभेमध्ये पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना म्हणून त्यांनी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. ‘सावली केअर सेंटर’, ‘Deep Stambh’ आणि ‘मुलींची फी माफी’ यांसारख्या योजनांतून त्यांची सामाजिक संवेदनशीलता दिसून येते.
‘कार्यकर्ता’ ते ‘मंत्री’ असा प्रवास करताना चंद्रकांतदादांनी कधीही आपली जमिनीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सामान्य माणसाचा विकास आणि महाराष्ट्राची प्रगती हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. संयमी स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा आणि कामाचा प्रचंड आवाका यामुळे ते आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘दादा’ व्यक्तिमत्व म्हणून आदराने ओळखले जातात.